महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी

टीव्ही वरील महायुतीच्या जाहिरातीचा महाविकास आघाडीने योग्य प्रकारे प्रतिवाद केला नाही. दोन स्त्रिया बोलत असताना एक स्त्री म्हणते,की सरकार बदललं तर अर्ध्या किमतीत एसटीचा प्रवास कसा होईल?
वस्तुतः आघाडीने कर्नाटक सरकारप्रमाणेच महिलांना एसटीचा प्रवास मोफत, तसेच लाडक्या बहिणींना रुपये ०३ हजार दरमहा आणि सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा रुपये ०४ हजार देणार होते. परंतु जनतेसमोर हे मुद्दे ठळकपणे मांडले गेले नाहीत. ठिकठिकाणी स्त्रियांचे मेळावे आयोजित केले नाहीत.

ही निवडणूक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनीच भाकरी फिरवल्यामुळे एकतर्फी झाल्याची कबुली युतीच्या नेत्यांनी दिली, यांतच सर्व काही आले. आता यापुढे सीएनजी रिक्षाचे भाडे वाढो वा घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ होवो, ह्या लाडक्या बहिणीं दरमहा मिळणाऱ्या रुपये २१००/- च्या गाजरावर पुढील पाच वर्षे निमूटपणे मूग गिळून दिवस ढकलतील...
तूर्तास इतुकेच...
जय हो 

--- राजू कसबे

Comments

Popular posts from this blog

बेबंदशाही

सरकार हवे कशाला?