पवित्र मृत्यू
शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, कारण सर्वसाधारणपणे मृत्यू हा भयावह, त्रासदायक व इहलोकीची यात्रा संपविणारा असतो. परंतु जगात असेही काही लोक आहेत, जे धार्मिक उत्सव, यात्रा, अनुष्ठान वगैरे समयी झालेल्या मृत्यूला पवित्र समजून घेतात , भलेही या घटना मानवी चुकांमुळे का घडलेल्या असेना !. जसे नुकत्याच होऊन दहीहंडी उत्सवाला दरवर्षी अपघाताचे गालबोट लागते. अनेक गोविंदा आयुष्यभरासाठी दिव्यांग होतात, कित्येकांचा मृत्यू होतो.पण कुणाला त्याचे इतके वाईट वाटत नाही. लोकांच्या श्रद्धेनुसार हे मृत्यू पवित्र धार्मिक कार्य करताना झालेले आहेत.
असे दरवेळी अनेक बाबतीत घडते, मग तो गोपालकाला असो, अमरधाम यात्रा असो,पंढरपूरची वारी असो वा कालचा गणेशोत्सव असो. नैसर्गिक आपत्ती वा मानवी चुकांमुळे, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाले तरी त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी अशी "पवित्र मृत्यू"ची मखलाशी उपयोगी पडते खरी!
- राजा सोलापूरकर
Comments
Post a Comment