रामराज्य

चार -पाच वर्षांच्या मुलींवर, तरुणींवर , विवाहित -अविवाहित महिलांवर,६०-९० वर्षांच्या ज्येष्ठांवरही दररोज कुठे ना कुठे बलात्कार झाल्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत. तिथे काय तपास वगैरे करुन वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. पण सरकारी फौज केवळ स्वारगेट -पुणे येथील घटनास्थळी चॅनल्सचा फौजफाटा सोबत घेऊन ठिय्या मांडून बसली आहे . बस स्थानकच नव्हे तर राज्यातील कुठलाही कानाकोपरा सुरक्षित नसल्याची सर्वसामान्यांची धारणा आहे .

बीडमधील गुन्हेगारी आटोक्यात येत नाही. परभणी खटल्यात काय सुधारणा आहे. ठिकठिकाणी कोयता गॅंग्स निर्माण होत आहेत. रात्री भरचौकात केक कापून वाढदिवस साजरे केले जात आहेत.

अच्छे दिन आणि रामराज्य म्हणतात ते हेच का???

                                                          --- राजू कसबे 

Comments

Popular posts from this blog

बेबंदशाही

सरकार हवे कशाला?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी